महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ एप्रिल ।निगडी येथील अमरधाम स्मशान भूमी दुरावस्था झाली असून, त्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना ईमेल करुन तक्रार दाखल केली असून संडास बाथरूम दुरावस्था झाली असून अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, या तक्रारीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना इमेलद्वारे दिले आहे.
महिला वर्ग तसेच पुरुष संडास-बाथरूम स्वच्छता करण्यात येत नाही. तर दुसरीकडे नवीन संडास बाथरूम बांधकाम सुरू असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन नवीन संडास बाथरूम कामाला गती देत नाही. गवत वाढलेले असून, मच्छरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सीमाभिंत तुटलेल्या अवस्थेत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ठेकेदारांना दर महिन्याला लाखो रुपये स्वच्छता व्यवस्थित ठेवण्यासाठी देत आहे तर दुसरीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सदर निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या अशा…
पेंटिंग काम करण्यात यावे अमरधाम स्मशान भूमी कमान उभारण्यात आली असून ती खराब अवस्थेत आहे.
स्मशानभूमी लोखंडी गेट तुटलेल्या अवस्थेत आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी.
असा मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारांना काळया यादित टाकून त्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने अंत्यविधी करण्यासाठी ज्या लोखंडी शेडमध्ये अंत्यविधी करण्यात येत आहे त्या ठिकाणी लोखंडी पत्रे लुटलेले आहे.