पिंपरी-चिंचवड ; सत्यम ज्वेलर्स च्या जबरदस्त ऑफर चा लाभ घ्या ; घडणावळीवर चक्क इतके % सूट.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । लग्न समारंभांचा सिझन जसा चालू होतो तसे इतर सर्व गोष्टीच्या खरेदीमधील महत्वाची ठरते ती सोन्याच्या दागिन्यांची खरेदी. आपल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील नामवंत व जुनी पेढी म्हणजे सत्यम ज्वेलर्स.

सत्यम ज्वेलर्स ने यंदा आपल्या ४०व्या वर्षात पदार्पण केले आहे . सचोटी, ग्राहकांचा विश्वास, रास्त मजुरी आणि ग्राहकांच्या मनात घर करेल अशी भरपूर डिझाइन्सची व्हरायटी यांच्या जोरावर आम्ही यंदा ४०व्या वर्षात पदार्पण केले आहे अशी भावना सत्यम ज्वेलर्स चे सर्वेसर्वा श्री. किरणराज चोपडा यांनी व्यक्त केली.

यंदाच्या लग्न समारंभासाठी सुवर्ण खरेदी करताना ग्राहकांचा विचार करून आम्ही एक आगळीवेगळी ऑफर सर्वासाठी देत आहोत, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर चक्क २५% सूट. हि सूट कॅश बॅक स्वरूपात असेल आणि हि योजना दि. १६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत सुरु असेल अशी माहिती श्री. महावीर चोपडा यांनी दिली. सोन्याच्या भावात सतत होणारी वाढ परंतु लग्नसराई असल्यामुळे सोन्याची खरेदी तर करावी लागणार अश्या महागाईच्या कात्रीत सापडलेल्या आमच्या सर्व ग्राहकांचा तब्बल २५% फायदा होईल आणि ४० वर्षे पूर्तीनिमित्त ही ग्राहकांना आमच्या कडून सप्रेम भेट आहे. आमच्या निगडी, कृष्णानगर व चाकण ह्या तिन्ही शाखांमध्ये हि ऑफर उपलब्ध आहे . ह्या ऑफरद्वारे पारंपारिक चपलाहार, कोल्हापुरी साज, ठुशी अश्या मराठमोळ्या दागिन्यांच्या बरोबरीनेच आधुनिक दागिन्यांमधील छोटे मंगळसूत्र, नवजात मुला-मुलींचे दागिने ते वधू-वरांचा साखरपुडा किंवा लग्नापर्यंतच्या भरजरी अश्या विविध डिझाइन्समधील दागिने आपण मनसोक्त खरेदी करू शकता. एवढंच नाही तर भारताच्या विविध राज्यांमधली कलात्मकता लक्षात घेऊन पोलकी, जडाऊ, अँटिक, कुंदन, ह्या व अश्या अनेक दागिन्यांची कलाकृतीही आमच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे अशी माहिती श्री दीपक व राहुल चोपडा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *