महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । Rishabh Pant Health Update: आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ ला सहा महिने शिल्लक असताना भारतीय क्रिकेटला सर्वात मोठा धक्का बसला. भारताचा सर्वोत्तम यष्टिरक्षक रिषभ पंत ( Rishabh Pant) याचा अपघात झाला आणि तो मागील काही काळापासून दूर आहे. त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी ६-७ महिने लागण्याची शक्यता आहे. काही चमत्कार घडला, तर रिषभ ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड कप खेळताना दिसू शकतो. पण, त्याला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची आहे आणि यष्टिरक्षक म्हणून त्याचं भविष्य अधांतरी आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाने लोकेश राहुल आणि इशान किशन हे दोन यष्टिरक्षकाचे पर्यात वन डे वर्ल्ड कप साठी ठेवले आहेत.
”रिषभ पंतच्या प्रकृतीत चांगली सुधारणआ होतेय, परंतु त्याला पुन्हा व्यवस्थित चालण्यसाठी आणि सरावाला सुरूवात करण्यासाठी किमान ६-७ महिने तरी अजून लागतील. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धा ही त्याच्यासाठी घाई ठरेल. त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे, अशी आमची इच्छा आहे. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी बराच वेळ त्याला लागू शकतो. त्यामुळे राहुल व इशान या दोन खेळाडूंकडे यष्टिरक्षक म्हणून आम्ही पाहत आहोत,”असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्टला सांगितले.