Car Drivers Precautions : कार चालकांनी उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या अधिक माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । सध्या महाराष्ट्रासह सगळीकडे उष्णतेची लाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडक उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी उष्माघात जीवावर बेतल्याची उदाहरणे ताजी आहेत. त्यामुळे उष्णतेच्या तडाख्यातून आपला बचाव करण्यासाठी अनेक लोक आता चारचाकीचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कार चालवत असताना कडक उन्हापासून आपला बचाव करुन घेणं गरजेचं आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या बातमीतून जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कारचालकांनी कोणती काळजी घ्यावी. (Car Drivers Precautions)

कारचालकांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गाडीची सर्व कामे करुन घेणे ही सर्वात महत्त्वाची काळजी आहे. कारण जर तुम्ही एखाद्या ठिकाणी रखरखत्या उन्हात जात असाल आणि तुमच्या गाडीमध्ये काही बिघाड झाला तर याचा खूप त्रास सहन करावा लागेल. बऱ्याचदा कार खरेदी केल्यानंतर 3 फ्री सर्व्हिसिंग वेळेत करून घेतली जातात. मात्र, त्यानंतर नियमितपणे सर्व्हिसिंग केले जात नाही. त्यामुळे असं न करता याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *