संविधानिक मार्गाने निषेध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यास निगडी पोलिसांनी घेतले ताब्यात

Spread the love

काळे झेंडे दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निषेध करणार होते सचिन काळभोर

पिंपरी-चिंचवड:
आशिया खंडातील सर्वाधित गतीने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (सोमवारी) होणार आहे. तसेच, आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रासह १६ प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या सुमारे 46 वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळाला नसल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध आंदोलन करणार होते. त्यांच्या आंदोलनाचा हा डाव हाणून पाडत आज सकाळी सकाळीच निगडी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना सुरक्षेच्या बाबीवरून ताब्यात घेतले.

परिणामी संविधानीक मार्गाने नेहमीच आंदोलनाचा पवित्रा घेणाऱ्या या निस्वार्थी सामाजिक कार्यकर्त्यास पोलिसांनी ताब्यात घेणे ही बाब निश्चितच लाजीरवाणी असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया निगडी परिसरातील नागरीकांमधून व्यक्त होत आहेत. काळभोर यांना पोलिसांनी सोडावे, अशी मागणी काळभोर समर्थकांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *