महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ मे । कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पद सिद्धरामय्या यांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. (Karnataka Siddaramaiah named as next CM by Congress say sources)
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी राहुल गांधी अधिकृत मुख्यमंत्रीपदाची घोषणा करणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांच्या नावाला शिवकुमार यांनीही संमती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, डीके शिवकुमार कर्नाटक प्रदेशाध्यक्षम्हणून कायम राहतील आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात दोन महत्त्वाची मंत्रालये दिली जातील असेही सांगण्यात आलं आहे.