महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ मे । सध्या उष्णतेत वाढ झाली आहे. कमाल तापमान या आठवड्यात ४० अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले होते. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उकाड्याचा लहान बाळांना आणि वृध्दांना त्रास होत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कडक उन्हामुळे दुपारी नागरिक तातडीचे काम असेल तरच घराबाहेर पडतात. अन्यथा ते काम टाळतात. यामुळे रस्त्यावर तुरळक नागरिक दिसतात. रस्ते ओस पडलेले पाहून लॉकडाऊन असल्यासारखे जाणवते. उकाडा टाळण्यासाठी नागरिक रात्री उशिरापर्यंत इमारतींच्या टेरेसवर, ओठ्यावर, प्रांगणात, पार्किंगमध्ये किंवा मोकळ्या हवेच्या ठिकाणी बसलेले असतात.