Pune Weather Update : पुण्याचे तापमान घाम फोडणार, आज घराबाहेर पडण्यापूर्वी पहा आजचे तापमान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मे । यावर्षी पुणे शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तसेच उन्हाळा महाराष्ट्रभराला बेजार करत आहे. त्यातल्या-त्यात पुणे-मुंबई सारखी महत्त्वाची शहरे यात होरपळून निघत आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही उन्हाचा तडाखा जाणवत आहे.

पुण्यात काल 20 मे रोजी तापमान 40 अंश सेल्सिअस होते.पुण्यात आज 21 मे रोजीही तापमान 40 अंश सेल्सिअस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उन्हाचा पार वाढत असल्यामुळे महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *