कामाची बातमी ; आता लवकरच ई-रेशन कार्ड ; घरबसल्‍या करता येणार दुरूस्‍ती ; क्‍यूआर कोडचा वापर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ मे । क्यूआर कोडसह असणारे ई-रेशन कार्ड लवकरच नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाने त्याचे काम सुरू केले आहे.

या सॉफ्टवेअरद्वारे नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाईन रेशन कार्डवरील नाव कमी करणे, नाव वाढवणे, पत्ता बदलणे आदी कामे करता येणार आहेत. यासह ऑनलाईन अर्जाद्वारे नवीन रेशन कार्डही काढता येणार आहे. रेशन कार्डशी संबंधित कामांसाठी तहसील अथवा पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही.

ई-रेशन कार्ड कोठूनही, कधीही डाऊनलोड करता येणार आहे. क्यूआर कोडचाही वापर करता येणार आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी जिथे रेशन कार्डची गरज असेल, त्या ठिकाणी प्रचलित रेशन कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही. ई-रेशन कार्ड आवश्यकतेनुसार डाऊनलोड करता येणार आहे. त्याचा हाताशी कार्ड नसतानाही वापर करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *