तपास हा तपासच असतो, कधीपर्यंत चालेल याचा नेम नाही! झिरवळांचा नार्वेकरांना चिमटा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ मे । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. या निकालानंतर शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्यास सांगितलं आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कधीही विचालं असता त्याचं उत्तर हे ‘सविस्तर तपास करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल’ असं असतं. याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळांना विचारलं असता ते म्हणाले की, लवकरात लवकर ही व्यासपीठावरील, किंवा सभागृहातली भाषा आहे. परवालाही लवकरात लवकर म्हणता येतं आणि सहा महिन्यांनाही लवकरात लवकर म्हणता येतं. फार तपास करण्यासारखं नाही, पूर्ण तपास सुप्रीम कोर्टाने करून दिला आहे. तरी त्यांना खात्री करण्याचा अधिकार आहे.

झिरवळ यांनी म्हटले की, “आता तपासण्यापलिकडे मार्ग नाहीये, सुप्रीम कोर्टाने ज्या 10-12 बाबी, त्रुटी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच त्यांच्या विरोधात आहे. एकच बाब आहे की ती तपासायला त्यांच्याकडे दिली आहे. तपास हा तपासच असतो तो कधीपर्यंत चालेल याचा नेम नाही. लवकरात लवकर ही व्यासपीठावरील, किंवा सभागृहातली भाषा आहे. परवालाही लवकरात लवकर म्हणता येतं आणि सहा महिन्यांनाही लवकरात लवकर म्हणता येतं. फार तपास करण्यासारखं नाही, पूर्ण तपास सुप्रीम कोर्टाने करून दिला आहे. तरी त्यांना खात्री करण्याचा अधिकार आहे. “

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर लवकरात लवकर सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 25 मे रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने राहुल नार्वेकर यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निवेदन त्यांना यावेळी शिष्टमंडळाने दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे प्रकरण सोपवलं आहे त्याबाबत लवकरात लवकर सुनावणी होईल, अशी आम्हाला खात्री असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या भेटीनंतर दिली होती. अध्यक्षांसोबत यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या शिष्टमंडळात अंबादास दानवे यांच्यासह आमदार ऍड. अनिल परब, पक्षाचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, रवींद्र वायकर, रमेश कोरगावकर यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *