निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प उद्यानास अतिक्रमणाचा विळखा

Spread the love

Loading

महापालिकेने ताबडतोब कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी

पिंपरीः

पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या निडगी येथील भक्ती-शक्ती शिल्प उद्यानासमोर हातगाडीधारक तसेच फुगे विक्री करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून, त्यामुळे उद्यान परिसराला बकालपणा आला आहे. त्या ठिकाणी ताबडतोब अतिक्रमण कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, अ क्षेत्रिय अधिकारी पानसरे मॅडम यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन या ठिकाणी कारवाई करत उद्यानाला प्राप्त झालेला बकालपणा दूर करावा. पर्यायी उपाय म्हणून भक्ती शक्ती उद्यानासमोर हातगाडी धारक व फुगे विक्रेते यांना उद्यानाच्या संरक्षणभिंतीपासून सुमारे ५०० मीटर लांब व्यवसाय करण्यासाठी स्थलांतरीत करण्यात यावे.

भक्ती-शक्ती उद्यान ह्या ठिकाणी शहरातील हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येत असून या ठिकाणी १०७ मीटर तिरंगा ध्वज डौलात फडकत आहे. येथील उड्डाणपुलाखाली फासेपारधी समाज वास्तव करत आहेत. त्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी काळभोर यांनी केली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी दिनांक ११ जून २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन या उद्यानाकडे दुर्लक्ष करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *