वारी जाता आले नाही, मग घरी बसल्या असा घ्या वारीचा आनंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुन । आषाढी महिना आला की वारीचे वेध वारकऱ्यांना लागते. मग हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले वारकरी दिसतात. दरवर्षी देहू येथून तुकोबांची पालखी निघते तर आळंदीहून ज्ञानोबांची पालखी जाते. ‘माऊली माऊली, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा हरिनामाचा गजर करीत लाखो वारकरी वारीत जात असतात. परंतु काही जणांनी जात येत नाही. त्यांनी आता निराश होण्याची गरज नाही. त्यांना घरीबसल्या वारी पाहता येणार आहे. आपली वारीसुद्ध आता हायटेक झालीय.


यंदा अशी असणार वारी
तुकोबा महाराजांची पालखी १० जून रोजी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तसेच आळंदी येथून ११ जून रोजी ज्ञानोबांची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा झाला हायटेक झाला आहे. पालखी रथाला जीआरएस लावले गेले आहे. यामुळे आता संपूर्ण वारी सोहळा QR कोड स्कॅन करत पाहता येणार आहे.

 

QR कोड करा स्कॅन
वारी हायटेक झाली आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब, Linkdin याचा QR कोड स्कॅन केल्यावर संपूर्ण वारी सोहळा पाहाता येणार आहे. ज्या भाविकांना वारीमध्ये जाता येत नाही, त्या भाविकांसाठी ही सोय संत तुकाराम महाराज संस्थानकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


Wari QU Code
राज्यभरातून शेतकरी वारीत
जून महिन्यात मान्सून सुरु होतो. परंतु राज्यभरातील शेतकरी शेतीची कामे पूर्ण करुन वारीत दाखल होत असतात. यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल झालाय. त्यातील बहुतांशी वारकरी हे शेतीच करतात. हे शेतकरी आपल्या शेतातील मशागतीची काम पूर्ण करुन वारीला येतात.

वाहतुकीत केला बदल
संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी एकत्रित येणार आहे. पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी घातली गेली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी १०० कर्मचारी राहणार तैनात करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. यामुले पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार आहे. पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ॲप तसेच सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *