Gold Silver Rate Today : आता खरेदीची सुवर्णसंधी ! सोन्या चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा प्रति तोळा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,६०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,८२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७३,१२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,९७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५४,६३३ प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,६०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६३३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६३३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,६३३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६०० रुपये आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *