वीर सावरकरांचा धडा वगळणं हे दुर्दैवी, नितिन गडकरी यांची प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुन । कर्नाटकमध्ये शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि डॉ. हेडगेवार यांचे धडे अभ्यासातून वगळणं हे दुर्दैवी असल्याचं गडकरी म्हणाले आहेत.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. कर्नाटक कॅबिनेटने गुरुवारी राज्यातील सहावी ते दहावीपर्यंतच्या समाजशास्त्र आणि कन्नड पाठ्यपुस्तकांतील अभ्यासक्रम बदलाला मंजुरी दिली. त्यानंतर त्यातून आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धड्यांना वगळण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *