Gold-Silver Price on 7 July 2023: ग्राहकांसाठी खुशखबर ! सोने झाले स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,४७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,५४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७०,२८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,१९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,५९८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,४७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,५९८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,४७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,५९८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,४७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,५९८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,४७० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यातइतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *