नितीन देसाई यांची व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये सुसाईड नोट मधून धक्कादायक खुलासा ; या पाचजणांनी ……..

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ ऑगस्ट । मी प्रचंड कष्टातून माझ्या स्वप्नातील भव्य स्टुडिओ साकारला. पण ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्या ईसीएल फायनान्स, एडलवाइझ कंपनीचे केयूर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर. के. बन्सल आणि इन्सॉल्वन्सी अधिकारी जितेंद्र कोठारी यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचा आणि माझी नाचक्की करून मला घेरण्याचा डाव आखला. या लोकांनी माझी वाट लावली आणि षड्यंत्र करून दडपून टाकत मला संपवले, अशी सुसाइड नोट प्रख्यात दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केल्याचे आज समोर आले.पोलिसांनी नेहा देसाई यांचा जबाब नोंदवला असून 11 पानांचा एफआयआर दाखल केला आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले?
– रशेष शहा हा गोडबोल्या असून अनेक छोटय़ामोठय़ा उद्योजकांसाठी मी कष्टाने बनवलेला स्टुडिओ त्याने गिळण्याचे काम केले.
– मी त्याला शंभर फोन केले. परंतु त्याने उचलले नाही. आर्थिक गुन्हे शाखा, एनसीएलटी कोर्ट, डीआरटी यांच्याकडून माझा प्रचंड छळवाद केला.
– माझ्याकडे दोन-तीन इन्व्हेस्टर गुंतवणूक करण्यासाठी तयार असताना मला सहकार्य केले नाही. माझ्यावर डबल, टिबल कर्जाचा बोझा टाकून मला प्रेशर केले जात होते.
– स्मित शहा, केयूर मेहता, आर. के. बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचा, माझी नाचक्की करण्याचा आणि मला घेरण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी माझी वाट लावली.
– मला पैशांसाठी धमक्या देऊन या नराधमांनी माझ्यावर दबाव आणला. सोन्यासारखे असलेले माझे ऑफिस विकायला लावले. एका मराठी कलाकाराला जीवे मारण्याचे काम या नराधमांकडून केले जात आहे.
– मला षड्यंत्र करून दडपून टाकत मला संपवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *