अमित शहा यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर जमावबंदीचे आदेश

Spread the love
  • रेडझोन समस्या सोडविण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यास निगडी पोलिसांनी घेतले ताब्यात
  • पोलिस प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर होतोय-सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर

पिंपरी-चिंचवड :

पिंपरी-चिंचवडः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (दिनांक 6 ऑगस्ट) पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी नोटीसीद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यावर रेडझोनची समस्या निवारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी नाराजी व्यक्त करत राजकीय तसेच पोलीसी बळाचा वापर करून आपल्यावर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी म्हटले आहे की, निगडी पोलिसांनी राजकीय दबावामुळे मला जाणीवपूर्वक नोटीस बजावली. शिवाय पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. त्या संदर्भात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलिस बळाचा वापर करून राजकीय नेते आमदार खासदार यांच्या दबावामुळे मला निगडी पोलिसांनी घेतले असून, त्या संदर्भात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून मी पुणे जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना लेखी स्वरूपात मागणी केली होती त्या संदर्भात राजकीय दबावामुळे मला नोटीस बजावली आली आहे. निगडी, तळवडे, चिखली, दिघी, बोपखेल, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, रावेत, किवळे गावातील संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्या संदर्भात २००० यार्ड क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर निगडी पोलिसांनी राजकीय दबावामुळे मला नोटीस बजावली आणि आता ताब्यातही घेतले आहे. त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *