चांदणी चौक होणार कोंडीमुक्त! नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकात होणार्‍या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे. अनेक वर्षे या समस्येने नागरिक त्रस्त झाले होते. त्यातून सुटका करण्यासाठी थेट 400 कोटी रुपये खर्चून येथे मोठा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

पुणे वाहतूक शाखेने केलेल्या अभ्यासात दररोज 0.281 दशलक्ष वाहने या चौकातून जातात. चांदणी चौक आणि इतर भागांतील नागरी पायाभूत सुविधांच्या कामांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला. त्यानंतर येथील कामाला गती आली. पुलाच्या कामामध्ये जुना पूल अडसर ठरत होता. तो जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात 30 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 1 वाजता स्फोट करून पाडण्यात आला. त्यानंतर कामाला गती मिळाली.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 1 मे रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण, ही ‘डेडलाइन’ उलटून गेली. आता या पुलाचे उद्घाटन 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. चांदणी चौकात एकूण 8 रॅम्प उभारण्यात आले असून, या प्रकल्पाचे उद्घाटन 28 फेब्रुवारी 2019 रोजी झाले. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामाला विलंब झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *