COVID 19 चा नवा व्हेरियंट ‘ERIS’ चा वेग वाढला; पुण्यात आढळला संसर्ग, लक्षणे काय जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । अमेरिका व युकेमधील वाढत्या प्रकरणांमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) COVID-19 च्या नव्या व्हेरियंटच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. , ‘EG.5.1’ , ज्याला ERIS म्हणून ओळखले जाते, हा कोविड १९ चा नवा व्हेरियंट झपाट्याने पसरत आहे. भारतात, आतापर्यंत, मे २०२३ मध्ये पुण्यात ओळखल्या EG.5.1 प्रकाराचे एक प्रकरण नोंदवले गेले आहे. लक्षात घ्या या क्षणी घाबरण्याची गरज नाही या व्हेरियंटचे विशिष्ट लस बूस्टर आणि पॅन-कोरोनाव्हायरस लस विकसित करण्याच्या संशोधनासाठी अभ्यास सुरु आहे व त्यासाठी अनुनासिक (नाकाद्वारे घेतल्या जाणाऱ्या) लसी वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ERIS म्हणजे काय?
EG.5.1 (उर्फ XBB.1.9.2.5.1) हा मूळ व्हेरियंटसह त्यात दोन अतिरिक्त (Q52H, F456L) प्रकारांसह पसरत आहे.जगातील ३९ देश आणि ३८ यूएस राज्यांमध्ये हा व्हेरियंट आढळला आहे. डॉ राजेश कार्यकर्ते, प्राध्यापक आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख, बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे व डॉ संजय पुजारी, संचालक, संसर्गजन्य रोग संस्था यांनी सांगितले की, “ERIS ही अधिकृत संज्ञा नाही तर XBB व्हेरियंटचा एक भाग आहे. जगातील बहुतेक प्रदेशांमध्ये SARS-COV-2 संसर्गाचे प्रमाण वाढण्यास हा व्हेरियंट कारणीभूत असल्याचे समजतेय,”

जागतिक स्तरावर, EG.5.1 चे रुग्ण २४ मार्च २०२३ रोजी आढळून आले. भारतात, EG.5.1 चे पहिले आणि एकमेव प्रकरण २९ मे २०२३ रोजी महाराष्ट्रात आढळून आले. जीनोम सिक्वेन्सिंगचे राज्य समन्वयक असलेले डॉ. कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी बी. जे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांच्या प्रयोगशाळेत जीनोम-अनुक्रमित असलेल्या कोविड-पॉझिटिव्ह RT-PCR- नमुन्यांमधून हा कोविड प्रकार ओळखण्यात यशस्वी झाली. यासंदर्भात तेव्हाच महाराष्ट्र व केंद्र सरकारला सूचित करण्यात आले.

कोविडचा नवा व्हेरियंट किती संसर्गजन्य आहे? लक्षणे काय आहेत?
यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) नुसार, २०.५१ टक्क्यांच्या साप्ताहिक वाढीसह हा प्रकार अतिशय वेगाने पसरत आहे. २० जुलै २०२३ पर्यंत यूकेमधील सर्व कोविड-१९ प्रकरणांमध्ये ते १४.५ टक्के वाटा हा नव्या व्हेरियंटचा आहे. . “आतापर्यंत, Omicron EG.5.1 मुळे अधिक गंभीर आजार होतो किंवा इतर प्रकारांच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा किंवा मृत्यूचा धोका वाढतो, असे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत,” डॉ. कार्यकर्ते म्हणाले.

“हा व्हेरियंट अधिक संक्रमणीय असल्याचे दिसतेय परंतु या टप्प्यावर, या प्रकारामुळे लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गंभीर आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे असे वाटत नाही.” असे डॉ पुजारी यांनी सांगितले.

घसा खवखवणे, सर्दी होणे किंवा नाक बंद होणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखी ही या नव्या व्हेरियंटची मुख्य लक्षणे आहेत, परंतु अनेक रुग्णांना मूळ कोविडसारखा लगेच ताप किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत नाही.

काय काळजी घ्यावी?
वृद्ध, अन्य आजरांनी त्रस्त व गर्भवती महिलांना या व्हेरियंटचा धोका अधिक आहे. हाताची स्वच्छता, गर्दीची ठिकाणे टाळणे, मास्क परिधान करणे, एखाद्याला श्वसनाचे कोणतेही आजार असल्यास सोशल डिस्टंसिंग पाळणे हे फायदेशीर ठरेल.

संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ अमित द्रविड यांनी सांगितले की, “सध्या आजारांचे प्रमाण वाढत आहे, H3N2, H1N1, डेंग्यू आणि टायफॉइडची प्रकरणे नोंदवली जात आहेत. त्यामुळे ज्यांना सर्दी, खोकला आणि ताप आहे त्यांनी त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी व तपासणी करून घ्यावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *