Ganeshotsav 2023: गणेशभक्तांना गणेशोत्सवात बसणार महागाईची झळ! कच्चा माल २५ टक्के अन मजुरीतही वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपला आहे. गणेशमूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.हजारो गणेशमूर्ती साकारल्या गेल्या आहेत. सात इंचापासून सात फुटापर्यंत उंच मूर्ती तयार झाल्या असून, रात्रंदिवस मूर्ती बनविण्यासाठी कारागीर मेहनत घेत आहे.

आतापर्यंत गणेशमूर्तींचे जवळपास २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. कच्च्या मालाच्या किमतीसह कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाल्याने यंदा गणेशमूर्ती महागणार असल्याचे दिसत आहे. (Ganeshotsav 2023 will hit by inflation 25 percent increase in raw materials and wages nashik) मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असून, गणेशमूर्तींच्या किमती २५ टक्क्यांनी वाढणार आहेत. बुकिंगनुसारही मूर्तिकार मूर्ती बनवत आहे. मंडळाचे पदाधिकारीही शहरातील विविध कारखान्यांवर मूर्ती बुकिंग करण्यासाठी गर्दी करीत आहे. गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, ढोल पथकांची तयारीही जय्यत सुरू आहे.

अशा आहेत कच्च्या मालाच्या किमती

गणेशमूर्ती बनविण्यासाठी कारागिरांना काथा, पीओपी, रंग अशा विविध वस्तू लागतात. ५० किलो काथ्याची किंमत पाचशेने वाढली असून, तीन हजार पाचशेपर्यंत काथा मिळत आहे.तर पिओपीची वीस किलोच्या गोणीमागे ५० रुपये वाढले असून, आता गोणी चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे. कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाली असून गतवर्षी बारा हजार रुपये घेणारे मजूर आता पंधरा हजार रुपये घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *