महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । शिंदे-भाजप सरकारमध्ये अजित पवार यांच्या गटाचा समावेश झाल्यापासून या दोन्ही पक्षांची चांगलीच कोंडी झाली आहे. अजितदादा गटाच्या एन्ट्रीमुळे शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांची मंत्रिपदे घटली. अजितदादा यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं. अजितदादा गटाला महत्त्वाची मंत्रिपदे द्यावी लागली. आता अजितदादा गटाने पालकमंत्रीपदांवर दावा केला आहे. मात्र, महत्त्वाच्या जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. विशेष म्हणजे शिंदे गट आणि भाजपने आधीच या पालकमंत्रीपदांवर दावा केला आहे. त्यामुळे तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकमंत्रीपदासाठी महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही आहे. तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे. असं असतानाच आता अजितदादा गटाकडून पुणे, नाशिक, रायगड आणि कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे.