महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जुन ।। गेल्या वर्षी पाऊस हवा तसा पडला नाही. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने तांदळाच्या किंमतीही वाढल्यात. भाजीपाल्यासह तांदूळ आणि डाळींच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
गेल्या वर्षी साधा तांदूळ साडेचार हजार रुपये क्विंटल दराने विकला जात होता मात्र हे दर वाढले आसून तोच तांदूळ साडेपाच हजार रुपये क्विंटल दराने विकले जात आहे.
बाजारात सध्या पॉलीश नसलेल्या आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळांना सर्वाधिक मागणी आहे. मात्र याच्या उत्पादनातही घट झाल्याने नागरिकांना आवडता तांदूळ खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
चिनोर तांदळाचे दर ६ हजारांहून ७ हजार २०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. राज्यात विविध गोष्टींवरील दर वाढत आहेत. अशात पोटाची खळगी भरण्यासाठी गरिबाच्या घरात नेहमी डाळ-भात बनवला जातो. मात्र हा साधा डाळ भात खाण्यासाठी देखील जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
आंबेमोहर तांदूळ – ७ हजार ८०० रुपये प्रतिक्लिंटल
इंद्रायणी तांदूळ – ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल
डाळीच्या दरांता कितीने वाढ?
गेल्या १५ दिवसांमध्ये डाळींच्या किंमतीही वाढल्यात. तूरडाळीच्या किंमती ४० ते ५० रुपयांनी वाढल्या आहे. गेल्या महिन्यात तूरडाळीचा भाव १४० ते १४२ रुपये प्रति किलो होता. हे दर आता वाढले असून डाळ १८० ते १९० रुपये प्रित किलोने विकली जात आहे. तर हरभरा डाळ ७० ते ७२ किलोवरून थेट ९० ते ९५ रुपये किलोवर पोहचली आहे.
कोथिंबिरीची एका जुडी ५० ते ६० रुपयांना
वाढत्या उष्णतेचा फटका शेतीमालाला बसल्याने पालेभाज्या आणि फळ भाज्यांचे भाव वाढले आहेत. आवक कमी झाल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची किंमत ५० ते ६० रुपयांवर पोहचली आहे.
कोथिंबीर, मेथी, कांदापातीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झालीय. तर श्रावणी घेवडा तीनशे रुपये झाला असून टोमॅटोही पन्नास रुपयांपर्यंत गेला आहे.