![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पिंपरी ।। पत्रकारिता आणि साहित्य यांचा अतिशय जवळचा संबंध असून पत्रकारांनी विविध क्षेत्रांमध्ये रस निर्माण करून काम केले पाहिजे. त्यामुळे लिखाण अधिक व्यापक, बहुअंगी आणि समृद्ध होते. पत्रकारांनी प्रचंड वाचन करावे, मोजके पण सकस लिहावे आणि वाटेल ते लिहिण्यापेक्षा चुकीवर प्रहार करून चांगल्या गोष्टींचे कौतुक करावे. पत्रकारांनी समाजाप्रती स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे; कारण पत्रकारिता संपली तर समाजही संपेल, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक Dr Hemant Desai यांनी व्यक्त केले.
Akhil Marathi Patrakar Sanstha महारा
ष्ट्र राज्य संलग्न Pimpri Chinchwad Shahar Patrakar Sangh यांच्या वतीने आयोजित “पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६” वितरण सोहळा गुरुवारी खराळवाडी, पिंपरी येथे पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात Balshastri Jambhekar यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचेही बक्षीस वितरण झाले. ‘वल्ड सामना’ला प्रथम, ‘थिंक पॉझिटिव्ह’ला द्वितीय, ‘गावगाथा’ला तृतीय तर ‘आनंद तरंग’ला चौथा क्रमांक देण्यात आला.
कार्यक्रमाला महापौर Ravi Landge, उपमहापौर Shailaja More, स्थायी समिती अध्यक्ष Abhishek Barne, विरोधी पक्षनेते Bhausaheb Bhoir, पत्रकार संघाचे संस्थापक Bapusaheb Gore, अध्यक्षा Sayali Kulkarni, माजी महापौर Yogesh Behl, उद्योजक Krishnakumar Goyal यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“पत्रकारांनी चुका दाखवून द्याव्यात” – महापौर
“महापालिकेकडून काही चुका झाल्यास पत्रकारांनी त्या निर्भीडपणे निदर्शनास आणून द्याव्यात. त्यातून सुधारणा करता येतील. तसेच चांगल्या कामाचेही कौतुक व्हावे. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही अराजकीय क्लब सुरू करून सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा व्हावी,” असे महापौर Ravi Landge यांनी सांगितले.
“साहित्य आणि संस्कृती टिकली तर समाज टिकेल”
उद्योजक Krishnakumar Goyal म्हणाले की, गुणवंतांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब आहे. पत्रकारितेने समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. साहित्य आणि संस्कृती टिकली तरच समाज टिकू शकतो. पिंपरी-चिंचवडची ओळख आता औद्योगिक शहराबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक नगरी म्हणूनही निर्माण होत आहे.
“हेवा वाटावा असे पुरस्कारार्थी”
विरोधी पक्षनेते Bhausaheb Bhoir म्हणाले की, काही वेळा पुरस्कार व्यवस्थापित केले जातात; मात्र पत्रकार संघाने निवडलेले पुरस्कारार्थी खरोखरच कौतुकास्पद असून त्यांचा इतरांना हेवा वाटावा असे कार्य आहे.
“पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू” – अविनाश चिलेकर
पुरस्कारार्थींच्या वतीने बोलताना ज्येष्ठ पत्रकार Avinash Chilekar यांनी पत्रकारांवर वाढत असलेल्या दबावाचा उल्लेख केला. “पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू आहे. प्रशासनातील भ्रष्टाचारावर पत्रकारांनी जाब विचारला पाहिजे. पत्रकारिता जिवंत ठेवायची की संपवायची, याचा विचार समाजाने केला पाहिजे,” असे ते म्हणाले.
‘पीसीएमसी टॉप १०’ पुरस्कारार्थी
“पीसीएमसी टॉप १०” पुरस्काराने पत्रकारिता क्षेत्रातील Avinash Chilekar, शासकीय अधिकारी मकरंद निकम, कामगार नेते शशिकांत (बबन) झिंजुर्डे, शैक्षणिक क्षेत्रातील प्रशांत पाटील, आर्किटेक्ट दीपक पाटील, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. राजेंद्र फिरके, सामाजिक क्षेत्रातील हणमंत माळी आणि रमेश वाघेरे, छायाचित्रकार नरेश नातू तसेच क्रीडा क्षेत्रातील मनीषा राठोड यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले