महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जुन ।। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत.
जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जनआक्रोश आंदोलन केले होते. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये त्यांनी उपोषणे केली. आता अंतरवाली सराटी येथे ४ जूनपासून उपोषण होणार असून येणाऱ्या काही दिवसात पावसाळाही सुरू होणार आहे. त्यामुळे उपोषणस्थळी पत्र्याचा मंडप टाकण्यात आला आहे.