महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुन ।। आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. मुंबईत रात्री जोरदार पाऊस झालाय. मुंबईत रात्री मुसळधार पाऊस होऊन अनेक भागात पाणी साचलंय. मुंबई, पालघरला येलो अलर्ट देण्यात आलाय तर ठाणे, रत्नागिरी, पुणे , रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सिंधुदुर्ग, कोल्हापूर रेड अलर्ट देण्यात आलाय. रायगड पालघर ठाणे मुंबई हे सगळं अलर्टवर आहे. ठाण्याला अकरा तारखेला ऑरेंज अलर्ट आहे. येलो अलर्ट म्हणजे आमचा वॉच असतो. ऑरेंज अलर्ट म्हणजे मोठा पाऊस येणार असतो. रेड अलर्ट म्हणजे तुम्ही काळजी घेतली पाहिजे अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी दिलीय.