Oath Taking Ceremony Video: शपथविधीवेळी राष्ट्रपती भवनात बिबट्या? ‘त्या’ व्हिडिओचं रहस्य उलगडलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुन ।। राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर आता दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण देत या घटनेचं गूढ उकललं आहे. पोलिसांनी सांगितलं की, काही मीडिया चॅनेल्स आणि सोशल मीडिया हँडलवर रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान दिसलेल्या प्राण्याचे फोटो दाखवण्यात आले. तो एक जंगली प्राणी असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, यामध्ये काहीही तथ्य नाही. कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्राणी एक सामान्य पाळीव मांजर आहे. त्यामुळे कृपया अशा अफवांवर लक्ष देऊ नका.

दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले की, शपथविधी सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात दिसणारा प्राणी हा एक पाळीव मांजर होती, कुठला जंगली प्राणी नव्हता. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या ७१ मंत्र्यांनीही राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. या सोहळ्यादरम्यानची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये एक प्राणी फिरताना दिसून आला.

राष्ट्रपती भवनातील शपथविधी समारंभाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा प्राणी हा बिबट्या आहे, असं नेटकरी म्हणतक होते. तो अत्यंत धोकादायक प्राणी असून शपथविधी समारंभात कुठली दुर्दैवी घटना घडली असती, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. मात्र, आता दिल्ली पोलिसांनी या सर्व अफवांवर पूर्णविराम लावला आहे. कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्राणी सामान्य पाळीव मांजर असून बिबट्या नसल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *