![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २०२४-२५ वर्षाकरिता अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्रताधारक व्यक्तींनी अर्ज करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.
पत्रकाचा आशय असा: या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय किंवा शेतीशी निगडित एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी लागणारे आर्थिक सहायक हे राष्ट्रीयकृत असलेल्या बँकेतर्फे परतफेडीच्या रूपाने सरकार उपलब्ध करून देत आहे. दिव्यांगांना कापड दुकान, भांडी दुकान, किराणा दुकान, झेरॉक्स मल्टी सर्व्हिस, मसाला उद्योग, कृषी सेवा केंद्र आदींसाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात येते.
लाभार्थींना या योजनेतून बँकेमार्फत दीड लाख रुपये कर्ज बँकेच्या नियमानुसार मंजूर झाल्यानंतर समाज कल्याण विभागाकडून मंजूर कर्जाच्या २० टक्के रक्कम सबसिडी म्हणून दिली जाते. पात्रताधारकांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावा. अर्ज करण्याची मुदत ७ जून ते ८ जुलैपर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी केले आहे.
दिव्यांगांनी स्वयंरोजगार योजनेसाठी अर्ज करावेत,
लाभार्थींना ८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी
शैक्षणिक कामांसाठी प्रमाणपत्रांची वाढली मागणी, कोणत्या प्रमाणपत्रासाठी काय काय हवे?
योजनेचे नियम व अटी
या योजनेकरिता दिव्यांग प्रवर्गातील अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग व्यक्ती अर्ज करू शकतात. मतीमंद (बौद्धिक अक्षम) प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तीस अर्ज करता येत नाही.
अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षाच्या आत असावे.
तहसीलदाराचे मार्च २०२५ पर्यंत वेद्य असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र १ लाखाच्या आतील जोडावे.
तहसीलदाराचे रहिवासी प्रमाणपत्र जोडावे.
बेरोजगार प्रमाणपत्र व ठराविक व्यवसायासाठीचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे.
रेशन कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र ४० टक्के किंवा त्यापुढे असावे दोन पासपोर्ट फोटो अर्जास जोडावे.
व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल जोडावा.
जागे बाबत भाडे पावती, करारनामा, मालकी हक्क पुरावा आदी जोडावे.
अर्जदाराने अर्जातील सर्व अटी शर्ती व्यवस्थित वाचूनच अर्ज करावा.![]()
