X वर आजपासून होणार मोठा बदल; युजर्सच्या हितासाठी निर्णय घेतल्याची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुन ।। सोशल मीडियाच्या जगात युजर्सची माहिती संरक्षण हा सगळ्यात महत्त्वा प्रश्न आहे. यावरच X (पूर्वीचे ट्विटर) ने मोठा निर्णय घेतला आहे. आज X वर लॉगिन करताच युजर्ससमोर एक संदेश झळकत आहे. यानुसार आता तुमच्या गोपनीय माहिती संरक्षणाच्या दृष्टीनं X युजर्स आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतर कोणालाही माहिती न पडता बिनदिक्कतपणे पोस्ट लाइक करण्यास सक्षम असतील. कारण X ने बुधवारपासून ‘लाइक्स’ खासगी केले.

‘तुमच्या आवडी आता खासगी आहेत. तुमच्या गोपनीयतेचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रत्येकासाठी लाइक्स खास0गी बनवत आहोत. अधिक पोस्ट लाइक केल्याने तुमचे ‘तुमच्यासाठी’चे फीड अधिक चांगले होईल. एकदा युजरने त्याच्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर त्याला हे पॉपअप दिसेल.

युजर्स तरीही त्यांना आवडलेल्या पोस्ट पाहण्यास सक्षम असतील (परंतु इतर पाहू शकत नाहीत), X च्या इंजिनिअर्सच्या टीमने ही माहिती दिली होती.
युजर्स त्यांच्या पोस्ट कोणाला आवडल्या हे पाहू शकतील. एखाद्याच्या स्वतःच्या पोस्टसाठी लाइक संख्या आणि इतर मेट्रिक्स अजूनही विशेष सूचनांखाली दर्शविले जातील.

‘उघड उघड दिसणारे लाइक्स हे चुकीच्या वागणुकीला प्रोत्साहन देत आहे. लवकरच तुम्ही कोणाची काळजी न करता लाईक करू शकाल. हे देखील एक लक्षात ठेवण्या सारखं आहे की तुम्हाला जितक्या अधिक पोस्ट्स आवडतील तितके तुमचे अल्गोरिदम अधिक चांगले होईल’, असं X चे अभियांत्रिकी संचालक, हाओफेई वांग यांनी मे मध्ये प्लॅटफॉर्मवर लिहिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *