Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात ‘या’ ड्रायफ्रूट्सचा समावेश केल्याने, लवकर मिळेल आराम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुन ।। सध्याची बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आजकाल लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तरूणाईमध्ये आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आपल्या आहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही औषधांसोबत आहारावर देखील लक्ष केंद्रीत करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहारात सुक्यामेव्याचा वापर करून तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही ड्रायफ्रूट्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात त्या ड्रायफ्रूट्सबद्दल.

काजू
काजूमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. पोटॅशिअम आणि कमी सोडिअचे घटक काजूमध्ये आढळतात. या घटकांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. त्यामुळे, काजूचा तुमच्या आहारात अवश्य समावेश करा.

अक्रोड
अक्रोड खायला तर सगळ्यांनाच आवडतात. या अक्रोडमध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडंट्स यांसारख्या पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, अक्रोडचे सेवन करणे उच्च रक्तदाबाच्या समस्येवर प्रभावी ठरू शकते.

या व्यतिरिक्त अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असते, जे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास मदत करतात.

बदाम
नियमित बदामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे, अनेक जण आहारात बदामाचा समावेश करतात. पोषकतत्वांनी समृद्ध असलेले बदाम उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत. बदाममध्ये असलेले अल्फा-टोकोफेरॉल आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रिक ठेवण्यास मदत करते.

पिस्ता
पिस्तामध्ये पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते. यासोबतच पिस्त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी देखील पिस्ता लाभदायी आहे. पिस्ता हा पोषकतत्वांनी आणि फायबरने समृद्ध असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे, तुमच्या आहारात पिस्त्याचा जरूर समावेश करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *