जाणून घ्या; १ जुलैपासून बँकिंगचे नवे नियम,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – देशात आजपासून म्हणजेच १ जुलैपासून बँकिंग नियमांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहे. आपल्यासाठी महत्त्वाचे हे बदल जाणून घेणे आवश्यक आहे.

आजपासून खातेधारकांना एटीममधून पैसे काढल्यानंतर देण्यात येणारी सुट बंद करण्यात आली आहे. आता पूर्वीप्रमाणेच मेट्रो शहरांमध्ये आठ आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये १० ट्रान्झॅक्शन करण्याचीच परवानगी असणार आहे. करोना काळात सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान बँकांनी ही सुट दिली होती. तेव्हा एटीएममधून अमर्याद वेळा पैसे काढण्याची मुभा देण्यात आली होती.

आता पुन्हा बचत खात्यासाठक्ष किमान रककेचा नियम लागू होणार. सर्व बँकांमध्ये बचत खात्यात किमान ‍किती रक्कम ठेवावी या संदर्भात नियम आहेत. म्हणून मिनिमम बॅलन्स अनिवार्य असणार आहे. मेट्रो शहर, शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा निरनिराळी आहे. बचत खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर बँक संबंधित खातेदारावर दंडात्मक कारवाई करणार आहे.
ग्राहकांना मिळणाऱ्या व्याजदरातही आजपासून बदल करण्यात आला आहे. सर्वाधिक बँकांनी बचत खात्यांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी बँकांमध्येही सर्वाधिक ३.२५ टक्के व्याज मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *