महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुन ।। साताऱ्यातून (Satara) वाहतुकीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. पहाटेपासूनच खंबाटकी घाटात ट्रॅफिक जॅम (Traffic Jam) झालं आहे. सकाळी सात वाजल्यापासून या समस्येला लोकांना तोंड द्यावं लागत आहे. यामुळे पुण्याकडून (Pune)साताऱ्याकडे (Satara) जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलिसांचे रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.