महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 3 जुलै ।। लांबचा प्रवास करण्यासाठी प्रत्येकजण हमखास ट्रेनचा प्रयाय निवडतो. कारण ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो. भारतात असणाऱ्या सार्वजनिक प्रवासाबाबत प्रत्येकाला काही नियम लागू केले असले तरी,त्या नियमाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जगभरातील लाखो व्यक्ती रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने कुठेही जायचे असल्यास तिकीट काढावे लागते. मात्र अनेक प्रवाशांना काही कारणास्तव किंवा रेल्वे तिकीट कन्फर्म न झाल्यास रेल्वे तिकीट रद्द करावे लागते.
सर्व कारणांमुळे तिकीट रेल्वेकडून (railway)रिफंड दिला जातो हेही अनेक प्रवाशांना माहित नाही. ज्या प्रवाशांना याबाबत माहिती आहे, त्यांना किती पैसे परत मिळतात आणि किती पैसे तिकीटातून किती पैसे कापले गेले हे माहिती नसते. तर आज आपण तिकीट रेल्वे संबंधित असलेल्या तिकीटाच्या काही नियमाबद्दल जाणून घेऊयात.
तिकीट रद्द करण्याशी संबंधित हे नियम आहेत
जर तुम्ही प्रवासासाठी तिकीट (ticket)काढले आणि ते कन्फर्मही झाले मात्र काही कारणास्तव हे तुम्हाला रद्द करावे लागले तर रेल्वे तिकीटच्या नियमानुसार प्रति व्यक्ती ६० रुपये शुक्ल त्या तिकीटाच्या रक्कमेतून कापले जाते. तेही जेव्हा तुम्ही ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या साधारण ४८ तास आधी तिकीट रद्द करता तेव्हाच.
जर तुम्हाला रेल्वेच्या स्लीपर क्लासचे तिकीट रद्द करायचे असल्यास त्यावेळी साधारण १२० रुपये शुल्क कापले जाते.
जर तुम्हाला थर्ड एसी कोचचे तिकीट रद्द करायचे असल्यास त्यावर तुम्हाला १८० रुपये तर सेंकड एसी कोचचे तिकीट रद्द केल्यावर साधारण २०० रुपये कापले जातात. शिवाय फर्स्ट एसी कोचचे तिकीट रद्द करायचे असल्यास साधारण २४० रुपये आकारले जातात.
आपण आतापर्यंत पाहिले ते प्रवाशांना काही कारणास्तव किंवा रेल्वे तिकीट कन्फर्म न झाल्यास रेल्वे तिकीट रद्द करावे लागते. त्यावर किती शुल्क (money)कापले जातात मात्र तुम्हाला माहिती आहे का ट्रेन सुटली तर तिकीटाचे पैसे परत मिळतात का? काय आहेत भारतीय रेल्वेचे यासंबंधित नियम तेही पाहूयात.
जर काही कारणास्तव तुमची ट्रेन स्टेशनवर गेल्यानंतर ही चुकते त्यावेळेस तुम्हाला ट्रेन सुटल्याच्या १ तासाच्या आतमध्ये TDR दाखल करावा लागतो.
TDR ही प्रत्येक प्रवाशांना दिलेली एक सुविधा आहे.ज्यामार्फत तुम्हाला प्रवासी तिकीटाचे पैसे तुम्ही परत काढू शकतात.
टीडीआर दाखल केल्यानंतर प्रवाशांना तिकीटाचे पैसे तुम्हाला साधारण ६० दिवसांच्या आत परत मिळतात.