पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही रवींद्र धंगेकर अॅक्शन मोडवर ; थेट पोलीस ठाण्यात …… ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जुलै ।। पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अॅक्शन मोडवर आले आहेत. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा आढावा घेणयासाठी धंगेकर वरळी पोलीस ठाण्यात दाखल दाखल झाले होते. दरम्यान या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी राज्य सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) जोरदार हल्लाबोल केलाय.

किड्या मुंग्याप्रमाणे त्याने महिलेला फरफटत नेलं
रवींद्र धंगेकर म्हणाले, मी महाराष्ट्राचा आमदार आहे. मी रविंद्र काटकर यांच्याशी बोललो, त्या मुलाचं वय 23 आहे. ज्या पबमधून तो नशा किंवा दारू प्याला तो व्हाइस क्लब हा रात्री उशिरपर्यंत चालतो अशी माहिती मिळाली. पहाटे नाखवा कुटुंबिय मासे घेऊन येत असताना किड्या मुंग्याप्रमाणे त्याने महिलेला फरफटत नेलं.

राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची मी भेट घेणार
मुंबईत मुख्यमंत्र्यांचे बुलडोझरबाबा असे फोटो लागले होते, मुंबई -ठाण्यात अनेक बार सुरू आहेत. पब संस्कृतीने महाराष्ट्राचं मोठं नुकसानं केलंय. हे पब नियम अटीनुसार नसतील तर त्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला हप्ता मिळतोय. राज्य उत्पादन शुल्क पोलीस यांच्याशी पार्टनशीपमध्ये अनेकांचे पब आहेत. हे बंद करण्याचे कोणीही धाडस करत नाही. राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची मी भेट घेणार आहे, असंही धंगेकर यांनी स्पष्ट केले.

लोकांनीही आता रस्त्यावर उतरायला हवं, हा विषय हातात घ्यायला हवा
पुढे बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात हे होत असेल तर महाराष्ट्रात माणसाची मान खाली जाण्यासारखे आहे. नशाबाज संस्कृती जर वाढत असेल तर पोलीस आणि आमच्या सारख्यांवर ही जबाबदारी आहे. लोकांनीही आता रस्त्यावर उतरायला हवं, लोकांनी हा विषय हातात घ्यायला हवा. मराठी सिनेमामध्ये जसे दाखवतात. आरोपी सापडतो त्याचे रक्ताचे नमुने बदलले जातात. आताही महाराष्ट्र सिनेमा प्रमाणे सुरू आहे. आम्ही काय बोललो की आमच्यावरच हसतात. खोटं बोला पण रेटून बोला असे हे सत्ताधारी आहेत.

मुलगा सापडत कसा नाही. त्या वरिष्ठांना कोणाचे फोन आले ही चिंतेची बाब आहे. आज तो 48 तासानंतर आला असल्याने त्याची नशा आता रक्तात मिळणार नाही. काल बापाला जामीन झाला आज कलमांमध्ये वाढ झालेली आहे. समाजात चुकीची वागणारी, पैशांवर सर्व सामान्यांना चिरडणारी आहेत. मी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *