Ajit Pawar News : अजित पवारांना बारामतीत प्रवेशबंदी ? ; ‘कार्यक्रमाला आलात तर…’, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर | मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी नेत्यांना प्रवेशबंदीच्या आवाहनाला उत्सुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आरक्षणांसाठी सरकारला दिलेली डेलाईन हुकल्याने मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाने देखील आक्रमक होत नेत्यांना अनेक ठिकाणी प्रवेश बंदी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांना देखील या प्रवेश बंदीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत मराठा समाजाने प्रवेश बंदी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने तसं आवाहन अजित पवार यांना केलं आहे.

अजित पवार येत्या शनिवारी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्याआधी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र अजितदादांनी येथे येऊ नये, असं आवाहन मराठा समाज बांधवांनी केलं आहे.

प्रतिक्रिया
मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना निवेदन
अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात उसाची मोळी टाकून करू नये, असा इशाराच मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. माळेगाव साखर कारखाना प्रशासनाला आणि माळेगावच्या पोलीस ठाण्याला मराठी क्रांती मोर्चाने रितसर निवेदन दिलं आहे.

विरोध झुगारुन आलात तर…
मराठा समाजाच्या तीव्र भावना पाहता अजित पवार आणि दादा भरणे यांच्या हस्ते होणारा मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये. पूर्ण ताकदीने आम्ही हजारोंच्या संख्येने तेथे उपस्थित राहू. तरी त्यांनी कार्यक्रम घेतला तर मराठा समाजाच्या तीव्र रोषाला आपल्याला समोरं जावं लागेल, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *