itel ColorPro 5G Launch : रंग बदलणारा 5G स्मार्ट फोन पाहिलाय का? जबरदस्त फिचर्स, किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। बाजारात 10,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये 5G स्मार्टफोन सहज उपलब्ध उपलब्ध होतात, पण कधी रंग बदणारा स्मार्ट फोन पाहिला आहे का? तोही ९९९९ रुपयांमध्ये. Itel ने ग्राहकांसाठी नवीन Itel ColorPro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कलर चेंजिंग बॅक पॅनल व्यतिरिक्त, या फोनमध्ये 12 जीबी रॅमही आहे. ग्राहकांना कमी किंमतीत उत्कृष्ट फिचर्ससह कलर चेंजिंगचाही अनुभव घेता येणार आहे.


हा कलर चेंजिंग itel स्मार्टफोन Lavender Fantasy आणि River Blue कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. कमी किमतीत लॉन्च करण्यात आलेल्या या फोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत आणि हा फोन खरेदी करताना तुम्हाला कोणत्या ऑफर्स मिळतील? पाहूयात..

Itel ColorPro 5G स्मार्टफोनची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. या किमतीत तुम्हाला या हँडसेटचा 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. कंपनी फोनसोबत 1 वर्षाची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी देत ​​आहे.याशिवाय तीन हजार रुपये किमतीची ट्रॉली बॅगही देण्यात येणार आहे. पण या दोन्ही मर्यादित कालावधीच्या ऑफर आहेत. १०० दिवसांच्या आत तुम्ही हा फोन खरेदी केला तरच याचा लाभ घेता येणार आहे.

डिस्प्ले: या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच HD Plus डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 6080 ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

बॅटरी क्षमता: 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh ची शक्तिशाली बॅटरी वापरण्यात आली आहे.

कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

रॅम: फोनमध्ये 6 जीबी रॅम असली तरी 6 जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 12 जीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *