हॉटेल, सलून चालू करण्यास परवानगी, जिम ला का नाही ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ओमप्रकाश भांगे – ता. ९ – मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता अनेक नियम आणि अटी लागू करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. यामध्ये बाजार, कपडा व्यापारी, डोमेस्टिक एअर लाइन्स, सलून व्यवसाय यांचा समावेश आहे. हॉटेल व्यवसायिक, लॉज, गेस्ट हाऊस यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मग जिम व्यवसायिकांनाचं परवानगी का देण्यात आली नाही. असा संतप्त सवाल जिम व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे.

जिम व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचा अवलंब करण्यास तयार आहोत. केवळ आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या. मागील जवळपास 4 महिन्यांपासून जीम बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंब आज आर्थिक अडचणीत आहेत. जिममधे जे जिम ट्रेनरचं काम करतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासोबतच व्यायाम करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारे प्रोटिन्सची दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे त्या व्यवसायिकांची देखील सध्या बिकट अवस्था आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *