Reid Hoffman: आता विसरा 9 ​ते 5 नोकरी, कामाची ही वेळ ? LinkedIn सह-संस्थापकाची भविष्यवाणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।।चाकरमान्यांसाठी 9 ते 5 ची वेळ रोजीरोटी असते पण सर्वच जण वेळेचे हे बंधन पाळत नाही. 9 ते 5 या वेळातील नोकऱ्या वेळ आणि कामाच्या दृष्टीने सर्वोत्तम मानली जाते. शिक्षण घेत आपल्या कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणारे तरुण तसेच भविष्यात नोकरी करू इच्छिणारे विद्यार्थी असोत किंवा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी या वेळेत नोकरी करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जाते मात्र, लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन यांनी कामकाजाच्या या वेळेबात अशी भविष्यवाणी केली आहे की लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.

लिंक्डइन सह-संस्थापकांचा अजब दावा
लिंक्डइनचे सह संस्थापक रीड होफमॅन यांनी कामाची ही वेळ येत्या काही वर्षात गुंडाळली जाईल असा अजब दावा केला आहे. होय होफमॅन म्हणाले की 9 ते 5 कामाची वेळ २०२३ पर्यंत संपुष्टात येईल.

9 ते 5 नोकऱ्या संपणार?
AI आजच्या कामात व्यत्यय आणत आहेत आणि जगातील जुनी किंवा पारंपरिक कामाची पद्धत हळूहळू संपुष्टात आणत आहेत, असे लिंक्डइनचे सह-संस्थापकांना वाटते. याशिवाय होफमॅन म्हणाले की, लोकांना भविष्यात नोकऱ्या मिळतीलच असे नाही तर त्यांनी फ्रीलान्स म्हणजेच गिग इकॉनॉमीमध्ये काम केले पाहिजे. म्हणजे लोक एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतील पण, नोकरीची सुरक्षितता कमी असेल ज्यामुळे तुम्हाला कामासाठी अधिक पर्याय मिळतील आणि तुमच्या कामठी लिक्विडीटी राहील.

रीड होफमॅन यांची भविष्यवाणी
उद्योजक आणि गुंतवणूकदार नील तापडिया यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून रीड होफमॅन यांच्या पूर्वीच्या भविष्यवाण्यांचा उल्लेख केला जे खरे ठरले आहेत. १९९७ मध्ये रीड यांनी सोशल मीडिया, शेअरिंग इकॉनॉमी आणि AI चे पर्व येईल अशी भविष्यवाणी केली तर, ChatGPT आल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या. त्याचवेळी, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना एआय तंत्रज्ञानासह काम करण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *