Today Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उताराचे सत्र पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनाचा सण आता जवळ आला आहे तसतसा बाजार अधिक उजळतोय. सणासुदीला सोन्याची मागणीही वाढते हे काही नवीन नाही. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी-मंदी नोंदवली जात आहे. अलीकडेच अर्थसंकल्पानंतर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली होती, पण जागतिक घडामोडींची पुन्हा एकदा सोने भाव खाऊ लागले असून चांदीची चमकही वाढली आहे.

दुसरीकडे, वायदे बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजीची हिरवळ पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या सत्रात सोन्याचा वायदा ७०,३०३ रुपयांच्या जवळ तर चांदीचा वायदा ८३ हजार रुपयांच्या जवळ व्यवहार करत होता. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या फ्युचर्स जोरदार सुरुवातीनंतर मंदावले. सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत तेजीसह सुरुवात झाली असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा ऑक्टोबरचा वायदा १२५९ रुपयांच्या वाढीसह ७१,३०३ रुपयांवर उघडला आहे.

सराफाबाजारातही सोन्याची किंमत वाढलेली दिसून येत आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ६५,६६० तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ७१,६३० इतकी आहे. एक किले चांदीसाठी आता ८४,१०० मोजावे लागणार आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहराचे नाव काय आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई
६५,६६० रुपये
पुणे
६५,६६० रुपये

नागपूर
६५,६६० रुपये

कोल्हापूर
६५,६६० रुपये

जळगाव
६५,६६० रुपये

ठाणे
६५,६६० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहराचे नाव काय
आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

मुंबई
७१,६३० रुपये

पुणे
७१,६३० रुपये

नागपूर
७१,६३० रुपये

कोल्हापूर
७१,६३० रुपये

जळगाव
७१,६३० रुपये

ठाणे
७१,६३० रुपये

चांदीचा आजचा दर
शहराचे नाव काय
आजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)

मुंबई
८४,१०० रुपये

पुणे
८४,१०० रुपये

नागपूर
८४,१०० रुपये

कोल्हापूर
८४,१०० रुपये

जळगाव
८४,१०० रुपये

ठाणे
८४,१०० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *