महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या शुभ दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्ट ला सर्वत्र साजरी केली जाणार आहे. सगळीकडे रक्षाबंधनचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त?
हिंदू पंचांगानुसार, १९ ऑगस्टला पहाटे ०३ वाजून ०४ मिनिटांपासून सुरू हेऊन रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होऊन रात्री ०९ वाजून ०८ मिनिटांपर्यंत राहील. तसेच त्या दिवशी संध्याकाळी ६.५७ ते रात्री ०९.१० या वेळेत राखी बांधणे अधिक शुभ राहील.
भद्रकाळ
यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आहे. पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे ५.५३ वाजता भद्रकाळ सुरू होऊन दुपारी १.३२ पर्यंत राहील. भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. कारण कथेनुसार, लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने भद्रकाळात राखी बांधली होती आणि त्याच वर्षी रामाने रावणाचा वध केला होता.
रक्षाबंधनला अनेक महिला भावासोबत देवाला ही राखी बांधतात जे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी देवाला राखी बांधल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, देवाला राखी बांधताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा.
गणपती बाप्पा
हिंदू धर्मात कोणतीही पूजा श्रीगणेशाला वंदन केल्याशिवाय पूर्ण होत नाही. गणपतीला लाल रंगाची राखी बांधल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते.
शंकर भगवान
रक्षाबंधन श्रावणात येत असल्यामुळे महादेवाच्या भक्तीत लोक तल्लीन होतात. त्यामुळे भगवान शंकराला राखी बांधणे शुभ राहते.
जय हनुमान
हनुमान हा भक्तांचे रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. त्यामुळे हनुमानाला लाल रंगाची राखी बांधणे शुभ राहील. तसेच कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होईल.
श्रीकृष्ण
श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाची राखी बांधणे शुभ राहते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.