![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ फेब्रुवारी २०२६ ।। मार्च २०२६ मध्ये बँकिंग कामकाजाचे नियोजन करताना खबरदारी घ्या! Reserve Bank of India (RBI) ने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे मार्च महिन्यात एकूण १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. सर्व रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यांसह विविध सण-उत्सवांमुळे वेगवेगळ्या राज्यांत सुट्ट्या असतील. त्यामुळे शाखेत जाऊन काम करायचे असल्यास आधी सुट्टीची खात्री करून घ्या. ऑनलाईन बँकिंग, UPI, ATM सेवा मात्र सुरू राहतील.
मार्च २०२६: प्रमुख सुट्ट्या
रविवार (५ दिवस):
१, ८, १५, २२, २९ मार्च – संपूर्ण भारत
दुसरा व चौथा शनिवार:
१४ मार्च (दुसरा शनिवार)
२८ मार्च (चौथा शनिवार)
इतर सण व प्रादेशिक सुट्ट्या:
२ मार्च (सोमवार): होलिका दहन – कानपूर, लखनौ
३ मार्च (मंगळवार): होली (धुळवड) – १५ राज्यांतील शहरे
४ मार्च (बुधवार): होली/या ओसांग – १७ राज्यांतील शहरे
१३ मार्च (शुक्रवार): चापचर कुट – ऐझॉल
१७ मार्च (मंगळवार): शब-ए-कद्र – जम्मू, श्रीनगर
१९ मार्च (गुरुवार): गुढीपाडवा, उगादी, नवरात्री प्रारंभ – ११ राज्यांतील शहरे
२० मार्च (शुक्रवार): ईद-उल-फित्र/जुमात-उल-विदा – ५ राज्यांतील शहरे
२१ मार्च (शनिवार): रमजान ईद/सरहुल – काही राज्यांत
२६ मार्च (गुरुवार): श्री रामनवमी – १३ राज्यांतील शहरे
२७ मार्च (शुक्रवार): श्री रामनवमी – ६ राज्यांतील शहरे
३१ मार्च (मंगळवार): महावीर जयंती – १५ राज्यांतील शहरे
टीप: काही सुट्ट्या विशिष्ट राज्ये/शहरांपुरत्या मर्यादित आहेत. आपल्या स्थानिक शाखेची यादी तपासणे आवश्यक आहे.
काय लक्षात ठेवाल?
आर्थिक वर्षअखेर (३१ मार्च) असल्याने बँकांमध्ये गर्दी वाढू शकते.
मोठे व्यवहार, चेक क्लिअरन्स, कर्ज-संबंधित कामे वेळेत पूर्ण करा.
डिजिटल सेवा उपलब्ध असल्या तरी शाखेतील प्रत्यक्ष कामांसाठी सुट्टीचा परिणाम होईल.
मार्च महिन्यातील या १८ सुट्ट्यांमुळे बँकिंग नियोजन आधीच करून ठेवा, म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळता येईल.
