महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।। सध्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोन येत आहेत. परंतु दिलेला नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यात परिवर्तन अटळ असून, विधानसभा निवडणुकीसंदर्भातील पुढचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा (ता. इंदापूर) येथे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पाटील काय निर्णय घेतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
वावड्यातील रत्नाई निवासस्थानी आयोजित सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. इंदापूर तालुक्याची विस्कटलेली घडी बसवावी लागणार आहे, असे नमूद करून पाटील यांनी इंदापूर विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले.
पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेच्या जागेसंदर्भात जे वक्तव्य केले ते महायुतीच्या धर्माचे पालन करणारे नव्हते. त्यांना महायुतीत हा अधिकार कोणी दिला. सगळ्यांशी विचारविनिमय करू तसेच भाजपच्या वरिष्ठांशीही चर्चा करू. मात्र कोणताही निर्णय अंधारात घेणार नाही, स्वाभिमानाने घेतला जाईल.”