‘पळून पळून कुठे जाणार’ जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ सप्टेंबर ।। गेल्या दोन आठवड्यापासून फरार असलेल्या जयदीप आपटेला (Jaideep Apte) अखेर अटक कऱण्यात आलीय. शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार असलेल्या जयदीपला कल्याणमधून अटक करण्यात आलीय.. दोन आठवड्यापासून तो फरार होता. कल्याण पोलिसांनी त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे दिलाय.. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला होता. शिवरायांची पुतळा जयदीप आपटेनं तयार केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे पळून पळून कुठे जाणार, महाराष्ट्र पोलिसांकडून कोणीच वाचू शकत नाही त्याला आता अटक करण्यात आली आहे. कठोर कारवाई होईल कुणालाही क्षमा नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जे लोक अफवा पसरवत होते त्यांना या माध्यमातून एक चपराक मिळाली आहे. जे काही घडलं ते दुर्दैवी आहे पण त्यापेक्षा जास्त या विषयाचा राजकारण करणं हे दुर्दैवी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा राहील यावर आम्ही आता काम करत आहेत, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

जयदीप आपटेच्या सुटकेची तयारी?
तर जयदीप आपटेला अटक करण्याच्या अगोदर 8 दिवसांपासून त्याच्या सुटकेची तयारी सुरू आहे. यासंदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. आपटेच्या जामिनीसाठी जे कायदेशीर मदत मिळतेय ती ठाण्यातून मिळतेय, असाही आरोप संजय राऊतांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *