पिंपरी-चिंचवडमधील वाकडमध्ये पोलिसांनी काढली सराईत गुन्हेगारांची ‘वरात

Spread the love

महाराष्ट्र २४ पिंपरी चिंचवड:,(प्रतिनिधी) 25 डिसेंबर:सदरक्षणाय खलनिग्रणाय ,महाराष्ट्र पोलिसांही गुन्हेगारांना आपला खाक्या दाखवला आहे. पिंपरी-चिंचवडमधील उच्चभ्रू असलेल्या वाकड परिसरात गेल्या काही वर्षांपासून दहशत निर्माण करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांची अक्षरशः ‘वरात’ काढण्याचा प्रताप वाकड पोलिसांनी केला आहे.
अरविंद गौरवसाठी, सूरज पवार, राहुल उर्फ बुग्या लष्करे आणि विशाल कसबे केवळ 20 ते 23 वर्षे वयोगटातील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले होते. त्यापैकी विशाल कसबे हा तर तडीपार गुंड आहे.
गेल्या काही वर्षांपासून आरोपी परिसरात दहशत निर्माण करत होते यामुळे आरोपी कसबेला पोलिसांनी तडीपार करण्यात आले होते. मात्र. तरी देखील तो आपल्या साथीदारांच्या मदतीने परिसरात येऊन दहशत निर्माण करीत होता. दोनच दिवसांपूर्वी मल्लारी मोतीराम लोंढे यांनी गुन्हेगारांना दुकान भाड्याने न दिल्यामुळे त्यांचे अपहरण करून त्यास मारहाण केल्याचा गुन्हा या चौघांविरुद्ध दाखल करण्यात आला होता. आज सकाळी या चारही आरोपींना घेऊन पोलिस काळा खडक परिसरात दाखल झाले. पोलिसांनी काळा खडक परिसरात आरोपींना चौकशीसाठी म्हणून बेड्या घालून बेनकाब फिरवत एकप्रकारे धिंड काढत त्यांना चांगला चोपही दिला. विशेष म्हणजे . नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरी प्रशंसाही केली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *