T20 World Cup : 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ‘या’ 2 संघांनी घेतला मोठा निर्णय! आता करणार ‘हे’ काम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जानेवारी ।। T20 World Cup 2024 : यंदा टी-20 वर्ल्ड कप 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर खेळला जाणार आहे. यावेळी 20 संघांनी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेतला आहे. आयसीसीने आगामी टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले.

टी-20 वर्ल्ड कपचे आतापर्यंत 8 सीझन झाले आहेत. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी दोन वेळा, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. यादरम्यान आता दोन संघांनी 2024 च्या टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी नेदरलँड्स आणि नामिबियाचे संघ दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीग SA20 संघांसोबत सराव सामने खेळणार आहेत. नेदरलँड्स आणि नामिबियाच्या खेळाडूंना SA20 मध्ये खेळणाऱ्या अनेक दिग्गज खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळू शकते. यामुळे त्यांना 2024 च्या वर्ल्ड कपची तयारी करण्याची संधी मिळेल. SA20 लीग बुधवारपासून सुरू होत आहे.

नेदरलँड्सचा सामना सनरायझर्स इस्टर्न केप, पारल रॉयल्स आणि एमआय केपटाऊनशी होईल, तर नामिबिया जॉबर्ग सुपर किंग्जविरुद्ध सराव सामने खेळेल. नामिबियाचे मुख्य प्रशिक्षक पियरे डी ब्रुयन म्हणाले की, SA20 संघांविरुद्ध सराव सामने खेळणे हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी त्यांच्या संघासाठी चांगली तयार असेल.

टी-20 वर्ल्ज कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघांना प्रत्येकी पाच संघांच्या चार गटात विभागण्यात आले आहे. नामिबियाचा संघ ब गटात तर नेदरलँडचा संघ ड गटात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात 1 जून रोजी होणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे.

20 संघ चार गटात –

अ गट: भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब गट: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट: न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

ड गट: दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी :

बुधवार, 26 जून, 2024 – सेमी 1, गयाना

गुरुवार, 27 जून, 2024 – सेमी 2, त्रिनिदाद

शनिवार, 29 जून 2024 – अंतिम, बार्बाडोस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *