अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.९ जानेवारी ।। देवगड तालुक्यात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे आंबा बागायतदार दास्तावला आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्यात ठीक ठिकाणी आंबा कलमांवर औषध फवारणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंतेत पडला आहे.


दोन दिवस अधुनमधुन ढगाळ वातारण होते. सोमवारी अचानक अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विशेषतः सह्याद्री पट्ट्यातील करुळ, कुंभवडे, करुळ, नावळे, सडुरे या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावासाने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर हवेत माञ गारवा निर्माण झाला. या पावसामुळे सध्या मोहराला आलेली आंबा व काजु पिकांना याचा फटका बसणार आहे. यावर्षी थंडीची तीव्रताही दरवर्षी प्रमाणे नाही. त्यातच चार आठ दिवसात हवामानात होणाऱ्या बदलचा या पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *