पुणेकरांनो सावधान! शिवजयंतीच्या मिरवणुकांनी शहराचा नकाशाच बदलला; आज कोणते रस्ते बंद, कुठून घ्या पर्यायी मार्ग?

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ मार्च २०२६ ।।पुणे शहरात आज तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या Shiv Jayanti निमित्त उत्साहाची लाट उसळली असली, तरी वाहनचालकांसाठी मात्र हा दिवस संयमाचा ठरणार आहे. कारण मिरवणुकांच्या गजरात शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा नकाशाच बदलून गेला आहे. सकाळी सात वाजल्यापासून अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंद अथवा वळवण्यात आली असून, त्यामुळे रोजच्या सवयीने गाडी हाकणाऱ्यांची आज चांगलीच परीक्षा होणार आहे. उत्सवाचा जल्लोष एका बाजूला आणि वाहतुकीची कोंडी दुसऱ्या बाजूला — अशा दोन टोकांच्या परिस्थितीत पुणेकर अडकणार असल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा शहरातील प्रमुख मिरवणुका पारंपरिक मार्गाने काढण्यात येत असल्याने लक्ष्मी रस्ता, Chhatrapati Shivaji Maharaj Road, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता तसेच Bajirao Road या मार्गांवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या रस्त्यांवर मिरवणूक सुरू असताना वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मिरवणूक पुढे सरकल्यानंतरच वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे. याशिवाय Laxmi Road, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली आहे. लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतील MG Road आणि ईस्ट स्ट्रीट परिसरातही वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, कारण या भागातही वाहतूक कोंडीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पर्यायी मार्गांची व्यवस्था केली असली तरी ती समजून घेतल्याशिवाय प्रवासाला निघालात तर पुण्यातील रस्ते तुम्हाला चक्रावून सोडतील. जिजामाता चौकातून Swargateकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक चौक मार्गे टिळक रस्ता असा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक असताना सोन्या मारुती चौक परिसरातील वाहतूक संत कबीर चौकाकडे वळवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील गणेश रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून ती वाहतूक दारुवाला पूल चौकातून वळवण्यात आली आहे. तसेच नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील वाहने अप्पा बळवंत चौक आणि बुधवार चौकाकडे वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे आज पुणेकरांनी घराबाहेर पडताना गाडीची चावी फिरवण्यापूर्वी थोडं डोकंही फिरवावं, असा सल्ला देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 🚦🚗

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *