अशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीवनशैली ; साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर ।। पंतप्रधाननरेंद्र मोदी आज त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या 74 व्या वर्षीही ते अत्यंत फिट आणि निरोगी आहेत. योगाभ्यास आणि संतुलित आहार हाच आपल्या निरोगी जीवनाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी अनेक वेळा म्हटले आहे. तर जाणून घेऊयात कशी आहे, पंतप्रधान मोदींची दैनंदिन दिनचर्या…

पंतप्रदान नरेंद्र मोदी स्वतःला फिट ठेवण्यासाठी वज्रासन, सेतुबंधासन, भुजंगासन आणि उत्तानपादासन आदी योगासने करतात. महत्वाचे म्हणजे, ते रोज केवळ साडेतीन तासच झोपतात. तसेच ते सायंकाळी सहा वाजल्यानंतर, काहीही खात नाहीत.

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री एल. मुरुगन एकदा म्हणाले होते की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजच्या दिनचर्येने अत्यंत प्रभावित झाले आहेत. मोदी रोज केवळ साडेतीन तास झोपतात आणि सायंकाळी सहानंतर काहीही खात नाहीत. ते नेहमी साधा आणि संतुलित आहार घेतात. ते साधारणपणे डाळ, भात, खिचडी असे पदार्थ घेणे पसंत करतात.

योगाने होते दिवसाची सुरुवात –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवसाची सुरुवात योगासनाने होते. ते रोज साधारणपणे 40 मिनिटांपर्यंत योग करतात. पंतप्रधान मोदी यांचा दिवस सूर्य नमस्कार आणि प्राणायाम केल्याशिवाय सुरू होत नाही. ते आठवड्यातून दोन वेळा योग निद्रा करतात. एकदा ते स्वतःच म्हणाले होते की, झोप न येण्याचा त्रास टाळण्यासाठी योगनिद्रा अत्यंत उपयुक्त आहे.

हलका नाश्ता आणि सायंकाळी 6 नंतर जेवण नाही –
पंतप्रधान मोदी शाकाहारी आहेत. ते अनेक वेळा उपवासही करतात. ते सहसा सकाळी नऊच्या सुमारास नाश्ता करतात. एकदा फिट इंडियाशी संबंधित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले होते की, त्यांना शेवग्याच्या शेंगाचे पराठे खूप आवडतात. त्यात मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात. अशा प्रकारचे पराठे दे आठवड्यातून दोन वेळा नक्की खातात. त्याचे रात्रीचे जेवणही अत्यंत साधे असते. यात मुख्याने गुजराती खिचडीचा समावेश असतो. सायंकाळी सहानंतर ते काहीही खात नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *