तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास आहे का? हे ३ पदार्थ अजिबात खाऊ नका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ सप्टेंबर ।। हल्ली किडनी स्टोनची समस्या ही सामान्य बनली आहे. मात्र हा आजार गंभीरतेने घेण्याची गरज आहे. किडनी ही शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे रक्त फिल्टर होण्याचे काम होते. रक्त फिल्टर होताना त्यातील सोडियम, कॅल्शियम आणि इतर मिनरल्सचे कण युरीनसोबत शरीराच्या बाहेर टाकले जातात मात्र जेव्हा रक्तामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियमसह अनेक मिनरल्सचे प्रमाण वाढते तेव्हा हे किडनी मध्ये जमा होऊन त्याचे लहान लहान दगडाचे रूप घेतात. याला किडनी स्टोन असे म्हणतात.

हा एक सामान्य मात्र तितकाच गंभीर आजार आहे. यात रुग्णाला खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. दरम्यान किडनी स्टोनचा त्रास कोणते पदार्थ खाऊ नयेत याबाबत जाणून घेऊय़ा.

मीठाचे प्रमाण मर्यादित
शरीरात सोडियमचे म्हणजेच मीठाचा अधिक स्तर झाल्यास युरिनमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढवतो. यामुळे जेवणात अधिक मीठाचा वापर टाळा. तसेच बाहेरचे पदार्थ खात असाल तर त्यातही मीठाचे प्रमाण किती आहे हे चेक करून घ्यावे. फास्ट फूडमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते तसेच रेस्टटॉरंटमधील खाण्यामध्येही सोडियमचे प्रमाण अधिक असते.

मटणाचे सेवन कमी करा
लाल मटण, पोर्क, चिकन, पोल्ट्री आणि अंड्यामुळे शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. अधिक प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने युरिनमध्ये सायट्रेट नावाचे रसायन कमी होते. सायट्रेटचे काम हे किडनी स्टोन होण्यापासून रोखणे हे असते. यामुळे प्लांट बेस प्रोटीनचे सेवन करा. यात तुम्ही क्विनोवा, टोफू,हम्मस, चिया सीड्स यांचा समावेश करू शकता. दरम्यान, प्रोटीन संपूर्ण शरीरासाठी हेल्दी आहे.

कोल्ड ड्रिंक आणि कॅफेन
कोल्ड ड्रिंक आणि कॅफेनच्या सेवनामुळेही किडनी स्टोनचा त्रास उद्भवतो. कारण यात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. किडनी स्टोनचा त्रास असल्यास अधिक चहा अथवा कॉफी पिऊ नये. कोल्ड्रिंकमधीलही फॉस्फरिक अॅसिडमुळे किडनीमधील स्टोनचा धोका वाढू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *