महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – ता. २५ जुलै – पूर्व लडाखमध्ये अखेर चीनला भारतासमोर नमतं घ्यावं लागलं आहे. लडाखमधील वादग्रस्त असलेल्या सीमाभागातून चीन सैन्यानं अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपलं सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-चीन सीमारेषेवर शांतता प्रस्थापित होण्याची गरजेचं असल्याचं द्विपक्षीय चर्चेतून निर्णय घेण्यात आला.
परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसारर शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये चर्चा करण्यात आली. सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर सैन्य मागे घेण्याबाबत चीनने सहमती दर्शवली.
14 जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर चीनला सैन्य मागे घ्यावं लागेल अशा सूचना देऊनही मुजोर चीन ही प्रक्रिया पूर्ण करण्यास तयार नसल्याचं लक्षात आलं. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुन्हा एकदा द्विपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान चीनला भारतासमोर झुकावं लागलं आणि आपलं सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाची येत्या काळात अंमलबजावणी करण्याबाबत सांगण्याच आलं आहे.
..
कंमांडरसोबत झालेल्या बैठकीत समजुदारपणाने काही करार करण्यात आले. याचं दोन्ही देशांकडून पालन होईल असं शुक्रवारी द्विपक्षीय बैठकीत मान्यही करण्यात आलं. याआधीही 5 आणि 6 जुलैला झालेल्या चर्चेनंतर चीन सैन्यानं माघार घेतली होती. गलवान खोऱ्यातून माघार घेऊन दुसरीकडे सैन्य हलवलं होतं. चीन ऐकत नसल्याचं पाहून भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली. शुक्रवारी कमांडरसोबत झालेल्या बैठकीत दोन्ही देशांना पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेण्याबाबत एकमत झालं असून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.