New tax rules from April 2026 : १ एप्रिलपासून मोठे आर्थिक बदल! घर खरेदी, गुंतवणूक ते परदेश प्रवास… ७ नव्या नियमांचा तुमच्यावर थेट परिणाम

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ मार्च २०२६ ।। नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच देशात अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले काही निर्णय १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. या बदलांचा परिणाम नोकरदार, व्यापारी, गुंतवणूकदार तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. विशेष म्हणजे Income Tax Departmentकडून काही प्रकरणांमध्ये आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदतही वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय कर सवलतींमध्ये काही बदल करण्यात आल्यामुळे काही करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शेअर बायबॅकवरील कर नियम बदल
कंपनीने गुंतवणूकदारांकडून स्वतःचे शेअर्स परत खरेदी केल्यास त्याला ‘बायबॅक’ म्हटले जाते. आतापर्यंत या व्यवहारातून मिळणाऱ्या रकमेवर लाभांशप्रमाणे कर आकारला जात होता. मात्र आता हा व्यवहार भांडवली नफा (Capital Gain) म्हणून गणला जाईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना पूर्ण रकमेवर कर भरावा लागणार नाही, तर केवळ नफ्यावरच कर आकारला जाईल. उदाहरणार्थ, १००० रुपयांचा शेअर कंपनीने १४५० रुपयांना परत खरेदी केल्यास फक्त ४५० रुपयांवर कर भरावा लागेल.

F&O ट्रेडिंग महागणार
शेअर बाजारातील Futures and Options व्यवहारांवरील कर वाढविण्यात आला आहे. फ्युचर्सवरील सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) ०.०२% वरून ०.०५% करण्यात आला आहे, तर ऑप्शन्सवरील कर ०.१% वरून ०.१५% पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ट्रेडिंग करणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे.

सॉवरेन गोल्ड बाँडवरील नियम
सरकारकडून थेट खरेदी केलेल्या Sovereign Gold Bondमध्ये मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक ठेवल्यास नफ्यावर कर लागणार नाही. मात्र शेअर बाजारातून दुसऱ्या गुंतवणूकदाराकडून खरेदी केलेल्या बाँडच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर कर आकारला जाईल.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील बदल
गुंतवणुकीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज वजा करण्याचा नियम आता बंद करण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे करपात्र उत्पन्न कमी करण्याचा पर्याय मर्यादित होणार आहे.

फॉर्म १५जी / १५एच प्रक्रिया सुलभ
ज्यांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा कमी आहे ते Form 15G आणि Form 15H सादर करून TDS टाळू शकतात. आता हे फॉर्म एकाच ठिकाणी जमा केल्यास विविध गुंतवणुकांवरील TDS प्रक्रिया सुलभ होणार आहे.

घर खरेदी प्रक्रिया सोपी
घर किंवा जमीन खरेदी करताना TDS जमा करण्यासाठी TAN क्रमांकाची गरज राहणार नाही. आता थेट PAN Card किंवा Aadhaar वापरून TDS भरता येणार आहे.

परदेश प्रवास स्वस्त
परदेश प्रवासासाठी टूर पॅकेज बुक करताना आकारला जाणारा TCS (Tax Collected at Source) मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. याआधी ७ लाखांपर्यंत ५% आणि त्यापुढील खर्चावर २०% TCS आकारला जात होता. आता मात्र सरसकट खर्चावर फक्त २% TCS आकारला जाणार आहे. त्यामुळे परदेश प्रवासाचा खर्च काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. ✈️💰

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *